Ad will apear here
Next
ठाण्यातील रस्त्यांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली.

ठाणे : ठाणे शहरामध्ये ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या सर्व रस्त्यांची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. ती कामे तात्काळ पूर्ण करण्याचे, तसेच जी कामे पूर्ण होणार नाहीत ती कामे सुरक्षित अवस्थेत आणण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

महापालिका आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यात पोखरण रोड नं. १, पोखरण रोड नं. २, सुरेंद्र इंडस्ट्रीज, तसेच प्रस्तावित पारसिक चौपाटी आदी ठिकाणी भेट दिली. या वेळी जयस्वाल यांनी उपवन, गावंड बाग ते घाणेकर आणि टिकुजिनीवाडी ते घोडबंदर रोड या रस्त्याची पाहणी करून ही कामे सुरक्षित अवस्थेत आणण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे निसर्ग उद्यानाच्या रस्त्यावर विद्युत व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. 

पोखरण रोड नं. दोनवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून ज्या ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत, त्या ठिकाणी पावसाळ्यात अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZBPBD
Similar Posts
‘पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविणार’ ठाणे : पारसिक डोंगरावरील वन विभाग व रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत ठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती
ठाणे पालिकेतर्फे दोन जुलैला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे उद्या, रविवारी, दोन जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.  
‘डिजी कार्ड’बाबत आयुक्तांनी घेतली मॉल आपरेटर्सची बैठक ठाणे :   तेल अवीवच्या धर्तीवर राबविण्यात येणारा ‘डिजी ठाणे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरावा, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मॉलधारकांची बैठक घेऊन या प्रकल्पाची संकल्पना त्यांना समजावून सांगण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाणही उपस्थित होते
गुणवंत प्रणव देसाईला ठाणे महापालिका घेणार दत्तक ठाणे : अपंग असूनही अॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या प्रणव देसाई या खेळाडूचा सर्व खर्च ठाणे महानगरपालिकेतर्फे उचलण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. अपंग खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याबाबत धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी समाजविकास विभागाला दिल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language